Vidhan Bhavan Scam : शिंदे गटातील नेत्याने पितळ उघड केलं अन् विधानभवनातील तब्बल 6 कर्मचाऱ्यांचे निलंबन

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधानभवन परिसरात कार्यरत असणाऱ्या तब्बल 6 जणांवर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक केली आहे.

Vidhan Bhavan Scam : शिंदे गटातील नेत्याने पितळ उघड केलं अन् विधानभवनातील तब्बल 6 कर्मचाऱ्यांचे निलंबन

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधानभवन परिसरात कार्यरत असणाऱ्या तब्बल 6 जणांवर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या नावाने बनावट लेटरहेड वापरुन काही बनावट पास तयार करून त्यांच्या विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आला. सचिवालयाच्या सुरक्षा विभागाच्या चौकशीनंतर विधीमंडळ सचिवालय तसेच मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून हा प्रकार उघड केला आहे.

हेही वाचा- Congress Leader Accident: दिल्लीहून परतताना कॉँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; लँड रोव्हरला भरधाव ट्रकची जोराची धडक, चालकही दगावला

यावेळी या प्रकरणावरुन विधान परिषदेत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेचा भडीमार केला, यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कबुली देत स्पष्ट केले की, “औद्यागिक महामंडळाच्या नावाने बनवाट लेटरहेड वापरले आणि त्या प्रवेशिका वाटण्यात आल्या होत्या.” या प्रकरणाचा खुलासा होताच सरकारने या कर्मचाऱ्यांना थेट नोकरीवरूनच काढले.

यात विधीमंडळ सचिवालयातील चार तसेच मंत्रालयातील दोन अशा सहा कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांची नावे मनोज मोरबाळे, महेश दुम्पलवार, स्वप्नील तायडे, लवेश नाकडे (विधिमंडळ सचिवालय) तसेच गणपत जावळे आणि नागेश पाटील (मंत्रालय) अशी आहेत, तसेच यात दत्तात्रय गुंजाळ या बाहेरील व्यक्तीचाही समावेश आहे. या प्रकरणानंतर आता सरकारने तटका फडकी निर्णय घेत तब्बल सात जणांना अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number